पारोळ्यात विविध संस्थांकडून पत्रकारांचा सत्कार

WhatsApp Image 2020 01 07 at 4.53.39 PM

पारोळा, प्रतिनिधी | पत्रकार दिनानिमित्त ६ जानेवारी रोजी महेश मेगा मॉल येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला सदानंद भावसार यांचे हस्ते माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

माध्यमांनी नागरी समस्या व मुलभूत गरजांवर जास्त लिखाण करणे गरजेचे असून सद्यस्थितीत प्रत्येक गल्ली बोळात झालेल्या अतिक्रमणाबाबत कोणी बोलत नाही, यावेळी त्यांनी नपाच्या कारभारावर टीका केली. हे अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने वाढत आहे असा सूचक प्रश्न जेष्ठ विध तज्ञ आनंदराव पवार यांनी महेश ग्रुप आयोजित पत्रकारांच्या गौरव सोहळ्या प्रसंगी केला.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य आदर्श शिक्षक स.ध.भावसार, राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशसंघटक बाळासाहेब पाटील, अॅड.  उज्वल मिसर, अॅड. तुषार पाटील, गणेश मरसाळे, ग्राहक पंचायतीचे  जिल्हा संघटक विकास महाजन,  महेश ग्रुपचे किसन हिंदी, विजय हिंदुजा, महेश हिंदुजा, अनिल हिंदुजा, विनोद हिंदुजा, योगेश  हिंदुजा, आशीष हिंदुजा, रावसाहेब भोसले, अभय पाटील, रमेश जैन, योगेश पाटील, विश्वास चौधरी, भुपेंद्र मराठे, संजय पाटील, राकेश शिंदे, दिलीप सोनार, विशाल महाजन, अशोक लालवानी, दीपक भावसार, बाळू पाटील, विकास चौधरी,देविदास चौधरी, विजय नावरकर, अशोक चौधरी, फोटोग्राफर संजय चौधरी यांच्यासह प्रिंट व इले, मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते.  यावेळी सर्व प्रतिनिधीना महेश गृपकडून गौरवण्यात आले. अॅड. उज्वल मिसर यांनी माध्यमांनी समाजहिताची कामे करण्याचे आवाहन केले. भावसार सर यांनी बाळशास्ञी जांभेकर यांच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन दीपक भावसार यांनी तर आभार महेश हिंदुजा यांनी मानले.

बालाजी प्रबोधनी-मंडळाकडून माध्यम प्रतिनिधींचा गौरव
बालाजी प्रबोधनी-मंडळाकडूनही माध्यमांच्या प्रतिनिधींना गौरविण्यात आले.यावेळी मुख्याधापक हेमंत पाटील, विजय बडगुजर, श्रीकांत पाटील यांनी संस्थेच्या सर्व उपक्रमांना.चांगली प्रसिद्धी देत असल्याचा उल्लेख करून आभार मानले. जिल्हा ग. स. बँकेच्या पारोळा शाखेकडूनही छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी अध्यक्ष विलास नेरकर, संचालक सुनील पाटील,  व्यवस्थापक अनिल पाटील, राजू  पाटील, शरद पाटील उपस्थित होते. विलास नेरकर यांनी माध्यमाचा कार्यशैली व जागृतीमुळे लोकशाही जिवंत असल्याचे सांगितले.

Protected Content