शिक्षकांना पीएफची रक्कम काढू द्या, अन्यथा याचिका दाखल करणार- जितेंद्र चौधरी

पारोळा प्रतिनिधी । राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पीएफ मधील रकमा काढू द्या, अन्यथा याविरोधात भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे न्यायालयात याचिका दाखल करतील, अशी माहिती भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौधरी यांनी दिली. 

भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मधून शिक्षक-शिक्षकेतरांना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी, घराची दुरुस्ती तसेच गृहकर्ज फेडण्यासाठी परतावा परतावा रक्कम काढता येते. परंतू मार्च महिन्यापासून राज्यातील शेकडो शिक्षकांचे प्रस्ताव बिडीएस बंद असल्याचे कारण सांगून पडून आहेत तर अनेक शिक्षक-शिक्षकेतर निवृत्त होऊन 6 महिने उलटले तरी त्यांच्या पीएफ मधील अंतिम परतावा रक्कम त्यांना मिळाली नाही. अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक यांच्याकडे निवेदन पाठवून शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्याची मागणी केली आहे. परंतू अद्यापही त्यावर कार्यवाही झाली नसल्याने शिक्षकांना हक्काचे पी एफ चे पैसे मिळविण्यासाठी शासनाच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा अनिल बोरनारे यांनी शासनाला दिला असल्याचे भाजप शिक्षक आघाडी जळगाव जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र चौधरी सर यांनी सांगितले. 

वेतन दिरंगाईचा शिक्षकांना फटका

१ तारखेला वेतन देण्याचा शासन निर्णय असूनही  राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांचे वेतन उशिरा होत असून त्याचा फटका शिक्षक-शिक्षकेतरांना होत असल्याने शासनाने शिक्षक-शिक्षकेतरांसाठी एक-एक महिन्याचा निधी न देता वर्षभराचा वेतन निधी मंजूर करावा अशी मागणीही अनिल बोरनारे यांनी केली आहे.

 

Protected Content