ठाण्यात सहाय्यक आयुक्तांवर केलेल्या हल्ल्याचा यावल नगरपरिषदेत कामबंद आंदोलन

यावल प्रतिनिधी ।  ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्तांवर केलेल्या हल्ल्याचा आज यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आज कामबंद आंदोलन करण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की, ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे हे आपले कर्तव्य बजावत असतांना एका माथेफिरूने त्यांच्यावर हल्ला करून हाताची बोटे कापली आणि डोक्याला मारहाण करून जखमी केली. एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला संतापजनक आहे. या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करून हल्लेखोरांना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज मंगळवार ३१ ऑगस्ट रोजी यावल नगरपरिषदेच्यावतीने काळी फिती लावून कडकडीत बंद ठेवून कामबंद आंदोलन करण्यात आले. 

यावेळी यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिक्षक विजय बढे, शिवानंद कानडे , राजेन्द्र काटकर , रवीन्द्र काटकर , असदउल्ला खान , नितिन पारधे , नितिन सुतार ,मुकेश गजरे , स्वप्नील म्हस्के , मोहन सोनार , आदी कर्मचाऱ्यांनी या निषेध आंदोलनात सहभाग घेतला.

Protected Content