यावल कृउबाच्या निवडणूकीत भाजपा-सेना विरूध्द ‘मविआ’त होणार लढत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कृउबा समितीच्या पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या वेगवान हालचाली सुरु झाल्या आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपशिवसेना अशी अत्यंत चुरशीची लढत राहणार असल्याचे चित्र दिसणार आहे. यात ठाकरे यांच्या शिवसेनेची भुमिका अत्यंत महत्वाची व निर्णायक ठरणार आहे.

यावल बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी विकासो मतदार संघातून ११, ग्रामपंचायत मतदार संघातून ०४, व्यापारी मतदार संघ २, हमाल मापाडी मतदारसंघातून १ अशा १८ संचालक पदाच्या निवडीसाठी पुढील येणाऱ्या महीन्यात मतदान होणार आहे.

यावर्षी ज्या शेतकऱ्याजवळ किमान १० गुंठे शेती आहे. अशा शेतकऱ्यास देखील प्रथमच बाजार समितीची निवडणूक लढवता येईल मात्र त्यासाठी विकासो संचालक अथवा ग्रामपंचायत सदस्यांमधून सूचक आणि अनुमोदक द्यावे लागतील असा निर्णय घ्याण्यात आला आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार समितीसह तालुक्यात तीन उपबाजार समित्या आहेत .

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत यावल मुख्य बाजार समितीसह फैजपूर पाडळसे किनगाव हे उपबाजार केंद्र आहेत. तालुक्यावरच मतदान केंद्र या निवडणुकीसाठी या वर्षात प्रथमच तालुक्यावरच फक्त मतदान केंद्र राहणार आहे.

याकरीता मतदार संघ निहाय मतदारांची संख्या अशी राहणार
१) विकासो मतदार संघ-६००, २) ग्राम पंचायत ६६६, ३) व्यापारी संघ ३३३, ४) हमाल-मापाडी संघ -१००८ असे एकुण २६०७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे .

मागील पंचवार्षिक निवडणुकीत पक्षनिहाय बलाबल पुढीलप्रमाणे
भाजपा-सेना१० संचालक निवडुण आले होते. यात नारायण शशीकांत चौधरी, उमेश प्रभाकर पाटील, राकेश वसंत फेगडे, कांचन ताराचंद फालक , सौ .ज्योती सुनिल नेवे, डॉ नरेन्द्र वामन कोल्हे, पांडुरंग दगडु सराफ, शिवसेनेचे तुषार सांडूसिंग पाटील , सुनिल वासुदेव बारी , भानुदास दगडु चोपडे, काँग्रेस ०७ संचालक यात नितिन व्यंकट चौधरी, अरूणा रामदास पाटील, विनोदकुमार पंडीतराव पाटील , सत्तार सुभान तडवी, पुंजो डिगंबर पाटील , योगराज डिगंबर बऱ्हाटे , उमेश सतिष बेंडाळे आणी अपक्ष संचालक म्हणुन अपक्ष अशोक त्र्यंबक चौधरी हे निवडुन आले होते . यंदाची निवडणुक ही मात्र अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे .

Protected Content