अवैध वृक्षतोडीतील अटकेत असलेले तिन आरोपी फरार , शोधकामी पथक रवाना

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील पुर्व वन विभागात मोठया प्रमाणावर वृक्षतोड करून वनसंपत्ती नष्ट करणारे अटकेत असलेले आरोपी हे पोलीस ठाण्याच्या परिसरातून फरार झाले असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

यासंदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतातील वन विभागाच्या पुर्व पेझरपाळा या कंम्पाडमेंट ( कक्ष ) क्रमांक ७९ आणि ८० मधील वनक्षेत्रातील ठिकाणी  अवैधरित्या मौल्यवान वृक्षांची तोड करीत असल्याच्या कारणांवरून वन विभागाव्दारे करण्यात आलेल्या कार्यवाहीत अटकेत असलेले आरोपी बिलालसिंग पावरा, प्यारासिंग पावरा आणि सुरेश पावरा या तिघ अटकेतील आरोपींंना दि. १२ ऑक्टोबर रोजी भुसावळ न्यायालयात हजर करून पुनश्च त्यांना यावल येथील प्रामीण रूग्णालयात सायंकाळी ७  ते  ७ .३० वाजेच्या सुमारास आरोपींची आरोग्य तपासणी करण्यात येवुन कस्टडीतील आरोपींना अटकेची प्रक्रीया करीत असतांना या विघ आरोपींनी पोलीस ठाण्याच्या आवारातून पळ काढला असून, या घटनेमुळे वनक्षेत्राच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात यावल वन विभागातील पुर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी याबाबतच्या घटनेला दुजोरा दिला आहे.  फरार झालेल्या तिघ आरोपींच्या शोधकामी वेगवेगळी पथक सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात रात्रीच पाठवण्यात आल्याचे म्हटले असून, फरार झालेल्या सर्व आरोपी विरूद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी दिली आहे.

 

Protected Content