यावल तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था ; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा फाटा ते डोंगर कठोरा गावापर्यंतच्या मार्गावरील रस्त्याची ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अत्यंत दयानिय अवस्था झाली आहे. रसत्याच्या झालेल्या या दुर्दशेमुळे वाहन चालकासह नागरीकांना मोठा त्रास सोसावे लागत असून याची दुरस्ती करण्याची मागणी होत आहे.

यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावापासुन यावल ते फैजपुर या प्रमुख मार्गाला जोडणारा डोंगर कठोरा फाटयापर्यंतच्या संपुर्ण सुमारे चार किलोमिटरच्या रस्त्याची मागील दोन वर्षापासुन ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने नागरीकांना वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. डोंगर कठोरा व परिसरातील गावातील नागरीकांना महत्वाच्या मार्गाशी जोडणारा हा एक प्रमुख मार्ग असुन या मार्गावरील खड्ड्यांकडे लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ लक्ष देवुन या रस्त्याच्या प्रश्नास मार्गी लावावा अशी मागणी नागरीकांकडुन होत आहे. त्याचप्रमाणे यावल चोपडा मार्गावरील चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या सुमारे तिन किलोमिटर लांबीच्या रस्त्याची मागील तिन वर्षापासुन अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असे चित्र निर्माण झाल्याने परिसरातील वाहनधारक, शेतकरी शेतमजुर व पादचाऱ्यांना या मार्गावरील रस्त्याने जातांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचा प्रश्न लोकप्रतिनिधी लक्ष घालुन सोडवावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ बांधव करीत आहे.

Protected Content