फैजपूर येथे नियम मोडणाऱ्या २०१ जणांची अँटीजन टेस्ट : दोघे आढळले पॉझिटीव्ह

फैजपूर, प्रतिनिधी  । येथे पोलीस व पालिकेचे  वरिष्ठ अधिकारी बुधवारी रस्त्यावर उतरले होते. कोरोना कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ८१  जणांवर कारवाई करीत पंचवीस हजाराच्या जवळपास दंड वसूल करण्यात आला. तर २०१  जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात दोघे जण बाधित असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.

फैजपूर शहरातील सुभाष चौकात बुधवारी सकाळी अकरा वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यत विना मास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात विना मास्क फिरणाऱ्या ३३ जणांकडून ७ हजार २०० रुपयांचा तर विनाकारण फिरणाऱ्या ३६ जणांकडून ७ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यासोबतच रिक्षाला पडदा न लावणाऱ्या१०  रिक्षाचालकांकडून ४ हजार रुपये तर विना हेल्मेट १५ दुचाकीस्वारांकडून १० हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.  तर दोघांवर  MV act इतर केस अंतर्गत ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. या कारवाया डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, एपीआय प्रकाश वानखेडे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, फौजदार रोहिदास ठोंबरे, फौजदार शेख मकसूद, यांचासह पालिका कर्मचारी व पोलीस तसेच होमगार्ड  यांनी ही कारवाई केली.बाहेर फिरणाऱ्या २०१ जणांची अँटीजन टेस्ट केली असता दोघे पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. ही कारवाई  फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीत  एसडीपीओ यांच्या उपस्थितीत सुभाष चौक येथे नाकाबंदी करून  करण्यात आली.

 

Protected Content