ऐन पावसाळ्यात पाचोऱ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई

tap water

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शहरात ऐन पावसाळ्यात पिण्याची टंचाई भासत आहे. पाचोरा नगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे नियोजन न केल्यामुळे ही पाणी टंचाई निर्माण झाल्याचा नागरींकानी आरोप केला आहे.

पाचोरा नगरपालिका प्रशासन पाण्याचे नियोजन करण्यास सुस्त भर उन्हाळ्यात भयानक दुष्काळ असतांना पाचोरा नगरपालिकेकडून एक रूपयाचा देखिल नविन पाण्याच्या नियोजनासाठी खर्च नाही. शहरातील एकाही विहिरींची साफ सफाई केलेली किंवा एखाद्या विहिरिचे अधिग्रहणाचे काम पाचोरा शहरात केलेले नाही. फक्त किरकोळ स्वरूपात बोरिंगच्या दुरूस्त्या केल्या आहे. पाचोरा नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व सत्ताधाऱ्यांनी वेळीच शहरात दुष्काळामुळे 15 ते 20 दिवसांनी मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचे निवारण करून शहरातील जनतेला सहकार्य करावे, असे आवाहन हरिभाऊ पाटील यांनी केले आहे.

Protected Content