Home क्राईम रेल्वेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवत २० लाखांची फसवणूक

रेल्वेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवत २० लाखांची फसवणूक


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रेल्वे विभागात नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत दोन जणांना तब्बल २० लाखांमध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील रहिवाशी मोहन फकीरा चौधरी वय-५६ यांच्यासह एकाला त्यांच्या मुलांना रेल्वे विभागात नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवत संशयित आरोपी प्रकाश हरचंद सोनवणे रा. भुसावळ याने दोघांकडून वेळोवेळी तब्बत २० लाख रूपये घेतले. त्यानंतर नोकरी लावण्याबाबत कोणतीही ऑर्डर आली नाही. त्यानंतर दोघांनी संशयित आरोपी प्रकाश सोनवणे याच्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. परंतू पैसे दिले नाही, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहन चौधरी व त्यांचे सहकारी यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रकाश सोनवणे याच्याविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound