अपघातात तरूणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कानळदा गावाजवळ मालवाहून रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनिवारी ८ जुलै रोजी रोजी रात्री १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मालवाहून रिक्षावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.  कपिल अशोक सपकाळे (वय-२४) रा. कठोरा ता.जि.जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कठोरा गावातील रहिवाशी असलेला कपील सपकाळे हा आपल्या आई व वडीलांसोबत वास्तव्याला होता. जळगाव शहरात खासगी नोकरीला होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ७ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कपील हा त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ एजे ६२८४) ने घरी जाण्यासाठी कानळदा मार्गे कठोरा येथे जाण्यासाठी निघाला होता. रस्त्यावरील कानळदा गावाजवळून जात असतांना एका अज्ञात मालवाहू ॲपे रिक्षा (क्रमांक एमएच १९ एस ७९००)ने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत कपीलचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर स्थानिक नागरीकांनी धाव घेतली. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे त्याची ओळख पटली.त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल आला. याप्रकरणी शनिवारी ८ जुलै रोजी रोजी मध्यरात्री १ वाजता मालवाहूर रिक्षावरील अज्ञात चालकावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ लीलाधर महाजन करीत आहे.

Protected Content