‘आप’ची जिल्हास्तरीय आढावा बैठक ; विधानसभेची चाचपणी

f9a2017a edd7 4c2e 98a9 4401284740d4

जळगाव (प्रतिनिधी) येथील पद्मालय विश्राम गृहात नुकतीच आम आदमी पार्टीची जिल्हास्तरीय विधानसभा निवडणूक आढावा बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

मंगळवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास येथील पद्मालय विश्राम गृहात जिल्हास्तरीय विधानसभा निवडणूक आढावा बैठकीस उत्तर महाराष्ट्र सचिव अॅड. प्रभाकर वायचळे व महाराष्ट्र राज्य युवा आघाडीचे राज्य उपाध्यक्ष स्वप्निल घिया हे उपस्थित होते. यावेळी अॅड. वायचळे व श्री. घिया यांनी यांनी बैठकीस मार्गदर्शन केले. या बैठकीस जिल्हाभरातून कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात पक्षाची पुनःबांधणी करण्याची आशा व्यक्त केली.

 

जिल्हास्तरीय पक्ष बांधणी बाबत अॅड. प्रभाकर वायचळे यांनी युवा जिल्हाध्यक्ष रईस खान व महानगरउपाध्यक्ष योगेश हिवरकर यांच्याशी चर्चा केली. कार्यकर्त्यांशी हितगुज करून जळगावजिल्हास्तरीय विधानसभा निवडणूक लढविणे बाबत तेसच कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करून उमेदवार देणे बाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी इच्छुकांकडून नावे मागविण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांची मते व अडचणी जाणून घेण्यात आल्या. या बैठकीस उत्तर महाराष्ट्र राज्य सचिव अॅड. प्रभाकर वायचळे , राज्य युवाउपाध्यक्ष स्वप्निल घिया, युवा जिल्हाध्यक्ष रईस खान , महानगरउपाध्यक्ष योगेश हिवरकर, युवा जिल्हाउपाध्यक्ष पुरुषोत्तम भालेराव, एरंडोल तालुकाध्यक्ष उज्वल पाटील, विवेक गुर्जर तसेच अश्पाक पिंजारी, अंजुम रजवी, डॉ. शरीफ शेख, अनिल वाघ सर, प्रा. डॉ आशिष जाधव व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content