तांबापुऱ्यात घरफोडी; ४८ हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील तांबापुरा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी धरातील रोखडसह दागिणे असा एकूण ४८ हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात पटेल गल्लीत रेशन दुकानाशेजारी तसलीमबी मोहम्मद सैय्यद वय ६० ह्या वास्तव्यास आहेत. २६ जून रोजी तसलीमबी ह्या कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्या होत्या, यादरम्यान चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश केला, तसेच घरातील लोखंडी कपाटाचे तसेच कपाटातील लॉकरचे कुलूप तोडून २५ हजार रुपये रोख व २३ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिणे असा एकूण ४८ हजारांचा मुद्देमाल लांबविला, शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तसलीमबी हृया घरी परतल्या असता, त्यांना घरात सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला, चोरीची खात्री झाल्यावर तसलीमबी यांनी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील हे करीत आहेत.

Protected Content