Home क्राईम धावत्या रेल्वेखाली अनोळखी पुरूषाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन

धावत्या रेल्वेखाली अनोळखी पुरूषाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन

0
228

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धावत्या रेल्वेखाली अनोळखी पुरूषाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहनधावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी पुरूषाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले असून नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव आसोदा रेल्वे रूळावर धावत्‍या रेल्वेखाली एक अनोळखी पुरूष आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार ११ मे रोजी सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास रेल्वे खंबा क्रमांक ४३४च्या २४ ते २२ दरम्यान आढळून आला आहे. यासंदर्भात भादली रेल्वे ठाण्याचे स्टेशनमास्तर यांनी नशिराबाद पोलीसांना माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मयताची अद्याप कोणतीच ओळख पटलेली नाही. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.


Protected Content

Play sound