वनसंरक्षकांवर तस्करांचा हल्ला; एक कर्मचारी जखमी

यावल प्रतिनिधी । वृक्षतोड करणार्‍यांना अटकाव करण्यास गेलेल्या वन संरक्षकांवर तस्करांनी केलेल्या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील सातपुडा जंगलात बेशुमार मोल्यवान वृक्षांची तस्करांकडुन वृक्षतोड करण्यात येत असुन याच संदर्भात काल रात्रीच्या वेळीस जंगलात वृक्षतोड करणार्‍यांनी कार्यवाही करण्यास गेलेल्या वनसंरक्षावर हल्ला केला असुन यात एक वन कर्मचारी जखमी झाला असुन यावल पोलीसात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लंगडा आंबा उसमळी वनकक्ष१२२ नियत क्षेत्रातील लगंडा आंबा नं .१असमळी गावा जवळ जंगलात काही इसम झाडे कापत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने त्या ठिकाणी सेवेत कार्यरत असलेले वनसंरक्षक उसमळी परिमंडल जामन्या गाडर्‍या ललीत रामदास सोनार (वय ५०वर्ष) हे आपले कर्मचारी घेवुन गेले असता आरोपी किसन डोंगरसिंग भिलाला, रावलसिंग किसन भिलाला आणी राकेश भिलाला (सर्व राहणार उसमळी ता. यावल) यांनी शासकीय कामात अडथळा करून ड्युटीवर कार्यरत असलेल्या वनसंरक्षाकाच्या अंगावर धावुन आले व त्यांच्या जवळील एसएलआर रायफल हिसकाण्याचा प्रयत्न केला व धक्काबुक्की करून शासकीय कामात व्यत्य आणले.

यावेळी वन मजुरांनी वनातील जंगलातील झाड तोडणार्‍यास पकडुन ठेवलेल्यांना राकेश भिलाला याने घटना स्थळावरून पळवुन लावले. या घटनेत वनसंरक्षक ललीत सोनार यांच्या डाव्या हाताच्या बोटास मार लागुन दुखापत झाली. यासंदर्भात वनसंरक्षक ललीत रामदास सोनार यांनी यावल पोलीसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Protected Content