खा. रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त औषधी वाटप

यावल प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश नारीशक्ती अध्यक्षा व भाजपा कार्यकर्त्या दिपाली चौधरी झोपे यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथे औषधी वाटप करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज एम तडवी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणु संसर्गाच्या संकटकाळात रुग्णांचे उपचार करतांना औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून नॉन कोवीड रुग्णांवर उपचार करण्यास आरोग्य यंत्रणेला मोठया अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. हिंगोणा प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या माध्यमातुन गोरगरीब परीस्थिती असलेल्या रुग्णांना उपचारासाठी मदत व्हावी या सामाजीक व विधायक उद्देशाने फैजपूर येथील खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा व भारतीय जनता पार्टीच्या सक्रीय सदस्या दिपाली चौधरी झोपे यांनी खासदार रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथे वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज एम तडवी यांच्याकडे अॅन्टीबायोटीक इंजेक्शन,सलाईन तसेच शक्तीवर्धक इंजेक्शन असे विविध प्रकारची औषधी स्वखर्चाने विकत घेऊन दिली आहे.     

याप्रसंगी पार पडलेल्या या कार्यक्रमास दिपाली चौधरी झोपे यांच्यासह प्रतिभा ठाकूर मॅडम, युवा कार्यकर्त्या कु.जागृती जी भोळे, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष संदिप पाटील, सिस्टर पुनम गावंडे,आशा स्वयंसेवीका सुरेखा धनगर  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.        

दरम्यान या अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीत गरजू रुग्णांना उपचारासाठी मदतीची गरज असतांनाच दिपाली चौधरी यांनी औषधांची मदत दिल्याबद्दल प्रा.आ.केंद्र हिगोणा येथील वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी तसेच रुग्णांनी देखील खान्देश नारीशक्ती गृप चे आभार व्यक्त केले.

Protected Content