एरंडोल तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी केले लसीकरण

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील पत्रकार संघाच्या सदस्यांना  (दि.११ मे) रोजी डीडीएसपी कॉलेजच्या लसीकरण केंद्रात लसीकरणाचा लाभ देण्यात आला. यावेळी, शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांनी कोरोना लसीचा डोस घेतला आहे.        

दरम्यान जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या आदेशान्वये तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.एस.चौधरी, कैलास महाजन, पंकज महाजन, प्रा.सुधीर शिरसाठ, शैलेश चौधरी, दीपक बाविस्कर, पिंटू राजपुत, उमेश महाजन, राजधर महाजन, संजय चौधरी, वाल्मीक पाटील, प्रविण महाजन, रतीलाल पाटील, प्रमोद चौधरी, गणेश महाजन, किशोर मोराणकर, नितीन महाजन यांच्या उपस्थितीत शहर व तालुक्यातील पत्रकारांना प्रांताधिकारी विनय गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ.कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी दिपक गायकवाड, पुनम धनगर, टिना बोरोले, योगिता परदेशी, आकाश मालाजंगम, राहुल जगताप, मनोज पाटील, ईश्वर मराठे यांनी लसीकरण केले.

याप्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ.कैलास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी यांनी आभार मानले. याप्रसंगी शिवसेना विधान सभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, डॉ.राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते आनंदा चौधरी, मनसे तालुकाध्यक्ष विशाल सोनार आदी उपस्थित होते.

 

Protected Content