अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या जळगाव जिल्हा संघटकपदी पल्लवी भोगे यांची नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी । अन्याय अत्याचार निर्मूलन समिती जळगाव जिल्हा संघटकपदी सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी भोगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

त्यांची ही निवड अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र जाधव यांनी मंगळवारी दुपारी नियुक्तीपत्र देवून केले आहे. त्यांची निवड झाल्याची माहिती जळगाव जिल्हाध्यक्षा ॲड. सिमाताई जाधव व  कार्याध्यक्षा मनिषाताई पाटील यांनी दिली. 

सामाजिक क्षेत्रातील कार्यात अग्रेसर असलेल्या पल्लवी भोगे हे महिला सबलीकरण व सक्षमीकरण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रासह बचत गटासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे. जळगाव अन्याय अत्याचार निर्मुलन समितीमार्फत कौटुंबिक खटल्यात समुपदेशन व संघटन वाढीसाठी त्यांचे विषेश योगदान लाभणार आहे. 

त्यांच्या निवडीबद्दल उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिता सोनार,  प्रदेश सल्लागार भीमराव मेश्राम, जयश्री पाटील, वैशाली बोरसे, नेहा जगताप, अलका बागुल, सुरेखा पाटील, फीरोजा बी. शेख, पुष्पा निकम, नसरीन पीरजादे, महानगर प्रमुख इरफान शेख, जितेंद्र रायसिंग, मुकेश सोनवणे, यांनी अभिनंदन केले आहे.

 

Protected Content