बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन उत्सहात साजरा

 

यावल, प्रतिनिधी । येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमीत् दि. २५ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या बालवाडी , प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या बक्षीस वितरण व सांस्कृतीक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल नगरपरिषदेचे नगरसेवक व सामाजीक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका कल्पना दिलीप वाणी ह्या होत्या. या वेळी शाळा अंतर्गत संपुर्ण वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये उत्तीर्ण इालेल्या व सहभागी झालेल्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांना वर्गनिहाय गट करून गटप्रमुखांना मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. कुंदन फेगडे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदनही केले. संस्कृतीक कार्यक्रमात शाळेतील बाल कलाकारांनी विविध प्रकारचे मराठी , हिंदी , धार्मीक , आदिवासी , विनोदी गाणे व नाट्यछटा सादर करून आकर्षक वेषभुषांनी पालकांची व प्रेक्षकांची दाद मिळवली. यशस्वीतेसाठी संस्था अध्यक्ष महेश वाणी, संचालक संतोष कवडीवाले , तेजस यावलकर, ऊमेष कवडीवाले, मुख्याध्यापिका सुवर्णा वाणी, अतुल गर्गे, विद्या कवडीवाले यांचे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रशांत महाजन यांच्यासोबत इयत्ता ८ वी च्या विद्यार्थीनींनी ऊत्कृष्ट रित्या केले.

Protected Content