लोणे फाट्याजवळ अपघात : एक ठार ; दोन जखमी

 

धरणगाव प्रतिनिधी | येथील जवळच असलेल्या लोणे फाट्याजवळ सवारी जीप व मोटार सायकल यांच्यात भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू तर २ जण गंभीर जखमी झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीप ने लोणे फाट्याजवळ मोटर सायकल ला जबर धडक दिली. यामध्ये मोटार सायकल वर असलेला एक जण जागीच ठार झाला तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जीप पलटी होऊन त्यामध्ये असलेल्या २ जणांना थोडे लागले असून काहींना किरकोळ खरचटले आहे. मृत व्यक्ती व गंभीर जखमी झालेले दोघे वैजापूर जवळ असलेल्या मेलाणे ता. चोपडा येथील असून कंडारी येथे नातेवाईकांकडे आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. घटनास्थळी अतिशय भयावह परिस्थिती पहावयास मिळाली असून जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी कोणतेही वाहन थांबत नव्हते. एका ओम्नी चालकाने माणुसकीच्या नात्याने २ जणांना आयसर मध्ये व एका व्यक्तीला स्वतःच्या गाडीतून ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे आणले. त्यांच्यावर उपचार व्हावा यासाठी तळमळ स्पष्टपणे जाणवत होती. सुरवातीचे उपचार केल्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले.

या सर्व प्रकारात १०८ ला कॉल करून देखील गाडी जवळजवळ १ तास उशिरा आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्पॉट वर धरणगाव पोलीस स्टेशनचे पी. आय. शंकर शेळके एपी आय पंचनामा केला असुन घटनेचा अधिक तपास पोलिस यत्रणा करत आहे

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!