वाल्मिक नगरातील जखमी वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाल्मिक नगरात राहणाऱ्या ६० वर्षीय वृध्दाचा पायी जात असतांना खाली पडून डोक्याला दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली . याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रामचंद्र जयराम सोनवणे (वय-६०) रा. वाल्मिक नगर, आसोदा रोड जळगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, रामचंद्र सोनवणे हे आपल्या परिवारासह वाल्मिक नगरात वास्तव्याला आहे. १४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत पायी चालत असतांना त्यांचा तोल गेला व रोडवर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना २० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमोल विसपूते करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!