वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी डॉ. सी. पी. लभाणे यांची निवड

जळगाव प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक येथे झालेल्या जिल्हा मेळाव्यात उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात डॉ. सी. पी. लभाणे यांची वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

 

वंचित बहुजन आघाडीच्या राज्याच्या अध्यक्षा रेखा ठाकूर आणि राज्य सरचिटणीस दळवी यांच्या उपस्थितीत डॉ. सी. पी. लभाणे यांची वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली

या विभागात नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात वंचित बहुजन आघाडीचे रचनात्मक आणि संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी डॉ. सी.पी. लभाणे यांच्यासह नवीन कार्यकारिणी काम करणार आहे.

डॉ. सी. पी. लभाणे यांची निवड झाल्याबद्दल डॉ. योगेश महाले, डॉ. के.के. वळवी, प्रा. सतीश पडलवार, नाना अहिरे, प्रा. संजय हिंगोणेकर, डॉ. सत्यजित साळवे, डॉ. विजय कांबळे, डॉ. जयेश पाडवी यांसोबतच सर्व स्तरातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!