
अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे कुसुम पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घडली. या संदर्भात रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात मालवाहू चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद पद्माकर पाटील (वय ३३, रा.गरताड ता.चोपडा) हे आपल्या कुटुंबीयासह वास्तव्याला असून शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता ते त्यांची स्कुटी क्रमांक (एमएच १९ डीसी ८६०८) चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १९ सीएक्स २२६७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत प्रमोद पाटील हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव हे करीत आहे.



