Home Cities जळगाव दिवाळी पहाट साजरी करण्याची परंपरा कायम; गांधी उद्यानात होणार पहाटेची खास मैफल

दिवाळी पहाट साजरी करण्याची परंपरा कायम; गांधी उद्यानात होणार पहाटेची खास मैफल

0
174


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित ‘पाडवा पहाट’ या पारंपरिक कार्यक्रमाचे यंदा २४ वे वर्ष आहे. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पहाटच्या निमित्ताने गेली २३ वर्षे प्रतिष्ठानने ही सुरेल परंपरा जपली आहे. यंदाची ही प्रात:कालिन मैफल महात्मा गांधी उद्यानात ठीक ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार आणि प्रख्यात गायक पंडित चारुदत्त आफळे हे आहेत. अनेक संगीत नाटकांमध्ये गायनाची भूमिका साकारणारे पंडित आफळे आपली कला सादर करतील. त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर, ऑर्गनवर राहुल गोळे आणि व्हायोलिनवर प्रमोद जांभेकर हे गुणी कलाकार साथसंगत करणार आहेत. कै. नथ्थू शेट चांदसरकर ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशनचे या कार्यक्रमास सहकार्य लाभले आहे. जळगावकरांनी या अविस्मरणीय पहाटेच्या मैफिलीचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.


Protected Content

Play sound