भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळील गिरणा नदीच्या पुलाजवळ भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार ६ मे रोजी दुपारी १ वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी ७ मे रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव पोलिसात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, नीलिमा पांडुरंग वाणी वय-५०, रा. जिल्हा पेठ जळगाव या महिला त्यांच्या दुचाकी एमएच १९ बी डब्ल्यू ५२२ याने बांभोरीगावाकडून जळगावला येत असताना गिरणा नदीच्या पुलावर समोरून येणारी बस क्रमांक ( एमएच २० बीएल ११३ ) ने महिलेच्या दुचाकीला जोदार धडक दिली. या धडकेत नीलिमा वाणी या गंभीरित्या जखमी झाल्या. दरम्यान या घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात बस चालक रवींद्र रामभाऊ बोरसे वय-५१ रा. धार ता. अमळनेर यांच्या विरोधात सकाळी ११ वाजता धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन महाजन हे करीत आहे.

Protected Content