बिहार निवडणुक : भाजपकडून तिसऱ्या टप्प्यातील ३५ उमेदवारांची यादी जाहीर

पटना । बिहार विधासभा निवडणुकीसाठी भाजपने तिसऱ्या टप्प्यातील ३५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या नावांवर पक्षाच्या केंद्रीय निवडणुक समीतीने शिक्कामोर्तब केले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील 35 उमेदवाराची नावं आणि विधानसभा मतदारसंघ –

भागीरथी देवी (रामनगर), रश्मि वर्मा (नरकटियागंज), राम सिंह (बगहा), विनय बिहारी (लौरिया), प्रमोद सिन्हा (रक्सौल), प्रमोद कुमार (मोतिहारी), लाल बाबू प्रसाद गुप्ता (चिरैया), पवन जायसवाल (ढाका),मोतीलाल प्रसाद (रीगा), अनिल राम (बाथनहा), गायत्री देवी (परिहार), विनोद नारायण झा (बेनीपट्टी), अरूण शंकर प्रसाद (खजौली), हरीभूषण ठाकुर (बिस्फी), नीरज कुमार सिंह (छातापुर), जयप्रकाश यादव (नरपतगंज), विद्यासागर केसरी (फारबिसगंज), रंजीत यादव (जोकीहट), विजय मंडल (सिट्टी), स्वीटी सिंह (किशनगंज), विनोद यादव (बायसी), कृष्ण कुमार रूषि (बनमनखी), विजय खेमका (पूर्णिया), तारकिशोर प्रसाद (कटिहार), निशा सिंह (प्राणपुर), कविता पासवान (कोढा), आलोक रंजन झा (सहरसा), संजय सरावगी (दरभंगा),  रामचंद्र साह (हायाघाट), मुरारी मोहन झा (केवटी), जीवेश कुमार (जाले), राम सूरत यार(औराई), केदार गुप्ता (कुढनी), सुरेश कुमार शर्मा (मुजफ्फरपुर), लखिंदर पासवान (पाटेपुर) यांच्या नावाचा यादीत समावेश आहे.

कोरोना संसर्गामुळे यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोंबर, दुसऱ्या टप्प्यातील 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.

Protected Content