कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व युवा सामाजिक कार्यकर्ते हर्षल गोंविदा पाटील यांचा सप्तरंग मराठी चॅनल व्दारे आयोजीत पुरस्कार सत्कार सोहळा कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावल तालुक्यातील सातोद या गावातील राहिवासी तथा राजकीय, सामाजिक, शैक्षणीक व कृषी क्षेत्रात भरीव अशी लक्षवेधणारी कामगिरी करणारे जिल्हा परिषदचे माजी सदस्य तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील यांचा जळगाव येथे सप्तरंग मराठी चॅनलच्या वतीने हॉटेल प्रोसिडेंट कोटेजच्या सभागृहात संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सुप्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपटातील सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते व डॉ उल्हास पाटील, अॅड नारायण लाठी, डॉ मुलचंद उदासी, अॅड संजय राणे, डॉ. प्रकाश महाजन, मोतीभाऊ मुनोत यांच्या प्रमुख उपस्थितीत सन २०२४ च्या खान्देश गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हर्षल पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, शरद महाजन, कृउबाचे संचालक व भाजयुवा मोर्चाचे राकेश फेगडे, कृउबाचे माजी सभापती नारायण चौधरी, जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता भालेराव, पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवी चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अज्जैनसिंग राजपुत, विलास चौधरी, नागेश्वर साळवे, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, डॉ कुंदन फेगडे, भाजयुवा मोर्चाचे सागर कोळीयांच्यासह आदी मान्यवरांनी स्वागत केले आहे .

Protected Content