राज्य सरकारच्या निषेधार्थ आमदारांसह शेतकऱ्यांचे मुंडण !

 

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । आ. मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ शेतकऱ्यांना बारा दिवसांनी जामीन मंजूर झाल्यानंतर राज्य सरकारचा निषेध करत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ शेतकऱ्यांनी सकाळी ऋषीपांथा येथे मुंडण करून सरकारविरोधात जाहीर निषेध करण्यात  आला

 

या  तालुक्यातील सात हजार शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याने .२६ मार्च रोजी महावितरण कंपनीचे  अधिकारी शेख  यांना  दोरीने बांधून आ. मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांसोबत आंदोलन केले होते. परिणामी आमदारांसह ३१ शेतकऱ्यांना अटक करण्यात  आली . बारा दिवस कारागृहात डांबून ठेवल्यानंतर जामीन मंजूर झाल्याने राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी चाळीसगाव मतदार संघाचे आ. मंगेश चव्हाण व ३१ शेतकऱ्यांनी मिळून आज सकाळी   बहाळ येथील ऋषीपांथा येथे मुंडण केले. यावेळी राज्य सरकार विरोधात जाहीर निषेध नोंदविण्यात आला. मुंडण करून तिघाडी सरकारचे तेरावे घातले व तीन पायाच्या खुर्ची वर तिघाडी सरकारचा फोटो ठेवून सरकारचे श्राध्द घालण्यात आले.

Protected Content