मोठी बातमी : चॉकलेट देवून चिमुकलीवर अत्याचार !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अंगणात खेळत असलेल्या अकरा वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेट आणि पैसे दिले आणि वडीलांना मारून टाकण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की, चाळीसगाव शहरातील एका भागात ११ वर्षाची अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता मुलगी ही तिच्या घरासमोर अंगणात खेळत असतांना संशयित आरोपी असफाक खान रऊफ खान याने तिला जवळ बोलावून चॉकलेट आणि १०० रूपये दिले. तसेच तिच्या वडीलांना मारून टाकण्याची धकमी देत तिला घरात नेवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी असफाक खान रऊफ खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी हे करीत आहे.

Protected Content