दुचाकी घसरल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विल्हाळे ते वरणगाव रस्त्यावरून घरी जात असतांना अचानक दुचाकी घसरून डोक्याला दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १५ जानेवारी रोजी दुपारी  ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज अशोक नाथ वय ३३ रा. रामपेठ वरणगाव ता.भुसावळ असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातल्या रामपेठ येथे मनोज नाथ हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. सोमवारी १५ जानेवारी रोजी दुपारी मनोज हा दुचाकीने वेल्हाळे येथून घरी जाण्यासाठी निघालेला होता. विल्हाळे ते वरणगाव रस्त्यावर त्यांची दुचाकी अचानक रस्त्यावर घसरली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रस्त्यावरील ग्रामस्थांनी धाव घेवून त्याला खासगी वाहनाने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी होती. या घटनेबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील हे करीत आहे.

Protected Content