राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा भाजप लढवणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात आता लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. इंडिया आघाडीत जागा वाटपांवर चर्चा सुरु झाली आहे. त्याचवेळी भाजप नेतृत्वाखाली एनडीएकडून लोकसभा जागा वाटपावर बोलणी सुरु आहे. एनडीएमध्ये भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीची राज्यावर रणनीती तयार करण्यासाठी मंगळवारी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे.

या बैठकीत महाराष्ट्रातील जागा वाटपांवर चर्चा होणार आहे. लोकसभेच्या भाजप 32 जागा भाजप लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.महाराष्ट्रात महायुतीमध्ये शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर छोटे पक्षही आहे. त्यात रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी, महादेव जानकर यांची रसपा, बच्चू कडू यांची प्रहार यांचा समावेश आहे. राज्यात भाजपकडून लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. भाजप राज्यातील ४८ पैकी ३२ जागा लढवणार आहे. मंगळवारी नवी दिल्लीत भाजपच्या होणाऱ्या बैठकीत त्या 32 जागांचा आढावा घेतला जाणार आहे. राज्यात भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार गट यांना केवळ 16 जागा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात अजित पवार गट 6 तर शिंदे शिवसेना 10 जागा लढवणार आहे. इतर लहान पक्षांना प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता कमी आहे.

भाजप राज्यातून जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी बड्या नेत्यांना लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवार आहे. त्यामध्ये राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा समावेश आहे. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना लोकसभा लढवण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून मिळण्याची शक्यता आहे.

Protected Content