भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू भुसावळ शहरात जालना येथील रहिवासी दोन जणांचा बुडवून मृत्यू झाल्याची घटना तापी नदी पात्रात समोर आले आहेत यामध्ये मामा भाच्याचा तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २१ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. रामराजे नंदलाल नाटेकर (वय-५५) व आर्यन नितीन काळे (वय- २१) असे मयत झालेल्या मामा भाचा यांची नावे आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील मामाची टॉकीज जवळील पेंढारवाडा येथे संदीप हरिश्चंद्र रणधीर यांच्या घरी देवाच्या कार्यक्रमासाठी मामा रामराजे नंदलाल नाटेकर आणि भाचा आर्यन गाडे हे आलेले होते. बुधवारी २० मे रोजी सकाळी भुसावळ शहरातील नदीपत्रात अंघोळीसाठी मामा रामराजे नाटेकर आणि आर्यन काळे हे गेले हो. दरम्यान आंघोळ करत असताना त्यांचा अचानक पाय घसरला आणि ते दोघेही पाण्यात बुडाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन दोघांना पाण्याबाहेर काढले. आणि भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल केले. दरम्यान येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमन चौधरी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या घटनेबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.