भुसावळात पोलीस कर्मचाऱ्याना ई-लर्निंग प्रशिक्षण

Bhusawal e learning

भुसावळ प्रतिनिधी । येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना गुन्ह्या संदर्भात संपूर्ण तपास सोयीस्कर व बरोबर होण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अॅकेडमी नाशिक यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गुगुल या वेबसाईटवर “ई-लर्निंग” हा उपक्रम सुरू केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.

पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे संदर्भात आजपर्यत ई-लर्निंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अॅकेडमी नाशिक येथे जाऊन 7 ते 15 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी जावे लागत होते. डिजिटल पोलीस या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अॅकेडमीने ई-लर्निंग हा उपक्रम प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी चालू करून दिला आहे. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर सहजरित्या बघण्याची सुविधा सुरू करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अॅकेडमी नाशिक यांचा महत्वाचा उपक्रम आहे.जो संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्टेशन व पोलिसांशी संबधित असलेले सर्व विभाग ए.टी.सी. वाहतूक शाखा,सायबर क्राइम ,व्ही.आय.सुरक्षा विभाग,बी.डी.टी.एस,सी.सी.टी.एन.एस विभाग, पोलीस वाहन चालक विभाग तसेच इतर विभाग यांच्या आपल्या सोयी करीता तसेच पोलिसांना गुहा संदर्भात संपूर्ण तपास सोयीस्कर व बरोबर होण्यासाठी तसेच इतर विभागातील कामकाज कशा पद्धतीने करावे या बाबतचे मार्गदर्शन व्हिडीओ या उपक्रमाव्दारे महाराष्ट्र पोलीस अॅकेडमी यांच्या मार्फत “गुगलच्या” Npanasik gov.in या वेबसाईटवर ई लर्निंग हे सुरू करण्यात आले आहे.

यामध्ये (1)क्राइम (2) पोलीस स्टेशन मॅनेजमेंट (3) कायदा व सुवेवस्था (4) निवडणूक (5) पोलीस संघटन (6) ऑनलाइन अभ्यासक्रम (7) सी.सी.टी.एन.एस. (8) इतर असे आठ मुख्य विषयांचा समावेश करण्यात आला असून त्यात प्रत्येक विषयासंदर्भात पोलिसांना आवश्यक असणाऱ्या माहिती बाबत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आले आहे.सदरचे व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आवड निर्माण होत आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची माहिती अशी आहे की, कुठल्याही एका विषयाचे सर्व व्हिडिओ पाहिले तर त्या पोलीस कर्मचाऱ्याला ऑनलाइन परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.व्हिडीओ पूर्ण न पाहिल्यास ऑनलाइन परीक्षा देता येणार नाही या गोष्टीची काळजी पोलीस कर्मचाऱ्यांना घेण्याची आवश्यकता आहे.परीक्षा दिल्यानंतर प्रमाणपत्र तयार होते.

याचा अर्थ असा की पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले. संपूर्ण जिल्ह्यास्तरावर ई-लर्निंगचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन करीत आहे. तसेच भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला वरिष्ठांच्या आदेशान्वये मा उपविभागीय पोलीस अधिकारी जानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.किशोर मोरे यांनी ई-लर्निंगची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. ती कर्मचाऱ्यांनी शांततेत आत्मसाथ केली.

Protected Content