भुसावळात झाडाझडती : पाच गुन्हेगार हद्दपार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलीस प्रशासनाने गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असणार्‍या पाच जणांना हद्दपार केले आहे.

भुसावळातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा सपाटा लावला आहे. मध्यंतरी काही काळ याला विराम मिळाला होता. तथापि, आता पुन्हा एकदा या प्रकारची धडक कारवाई करण्यात आली असून पाच गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये गुन्हेगारांची एक टोळी आहे. यात टोळीचा प्रमुख गौरव बढे, भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, सचिन अरविंद भालेराव व जितू शरद भालेराव यांचा समावेश आहे. यासोबत अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कृष्णा खरारे याला देखील हद्दपार करण्यात आले आहे. यातील गौरव बढेसह त्याच्या टोळीला दोन तर कृष्णा खरारेला एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. डीवायएसपी यांनी पाठविलेल्या प्रस्तावावर प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी ही कारवाई केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: