शाहूनगरात मध्यरात्री घरातून रोकडसह मोबाईलची चोरी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहू नगरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरातून रोकड आणि मोबाईलची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा मंगल बांगडे (वय-४०) रा. शाहू नगर, जाणता राजा चौक जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री १  ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान कुटुंबियांसह सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील ४ हजार २०० रूपयांची रोकड आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी सुवर्णा बांगडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. सुवर्णा बांगडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी १४ डिसेंबर रेाजी दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ करीत आहे.

Protected Content