जळगावात मेडीकल व्यवसायिकाची दीड लाखात फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रिंगरोडवरील राहणाऱ्या मेडीकल व्यवसायीकाची दीड लाखात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, प्रसन्न नरेंद्र जैन (वय-३५) रा. चंद्रप्रभा कॉलनी रिंगरोड हे मेडीकल साहित्य खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. ९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० ते १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यात त्यांनी फार्मासीटीकल इण्डी लिमीटेड कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून आपल्याला सिरीन अर्थात इंजेक्शन पुरण्याचे काम आपण देवू इच्छीतो असे सांगितले. त्यानुसार प्रसन्न जैन यांच्या विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ४० हजार रूपयांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रसन्न जैन यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी प्रसन्न जैन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करत आहे.

Protected Content