हॉटेल चिनार समोरून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हॉटेल चिनार गार्डन समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोगिंदर जगदंबाप्रसाद मौर्य (वय-४०) रा. यमुना नगर, बालाजी मंदिररोड, अयोध्या नगर हा तरुण आपला कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २२ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान जोगिंदर मौर्य हा जळगाव शहरातील चिनार गार्डन हॉटेल जवळ कामाचे निमित्ताने दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीपी ५३८०) क्रमांकाच्या दुचाकीने आला होता. दरम्यान काम आटोपल्यानंतर जोगिंदर हा त्याच्या दुचाकीजवळ आला असता त्याला दुचाकी जागेवर दिसून आले नाही. त्याने परिसरात संपूर्ण शोध घेतला असता दुचाकी मिळाली नाही. अखेर सहा दिवसानंतर मंगळवारी २८ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.

Protected Content