वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आव्हाणे शिवारातील कचरा डेपोजवळून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या टॅक्टरवर कारवाई करत असतांना चालक हा ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारात असलेल्या कचरा फॅक्टरी रोडवरून मंगळवार मंगळवारी २८ जून रोजी सकाळी ११ वाजता ट्रॅक्टर क्रमांक (एमएच ३३, एफ ३५३९) मधून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करत असताना गस्तीवर असलेले तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांना दिसून आले. दरम्यान, ट्रॅक्टर चालकाजवळ जावून वाळू वाहतूकीचा परवाना असल्याची माहिती पोलीसांनी विचारले असता वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले आहे.  दरम्यान कारवाई करण्यासाठी त्याला ट्रॅक्टर जमा करण्याचे सांगितले असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. या संदर्भात पोलीस नाईक दीपक साहेबराव कोळी यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल तायडे करीत आहे.

Protected Content