एनएसईमध्ये झोल : सुब्रमण्यम अटकेत

चेन्नई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |  नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी व्यवस्थापकीय संचालक आनंद सुब्रम्हण्यम यांना उशिरा अटक करण्यात आली आहे.

सीबीआयने आनंद सुब्रम्हण्यमची तीन दिवस चौकशी केली होती. चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता.

केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने को-लोकेशन फॅसिलिटी प्रकरणात दिल्लीस्थित जझॠ सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि प्रवर्तक संजय गुप्ता यांच्याविरुद्ध स्टॉक मार्केटच्या बातम्यांपर्यंत लवकर प्रवेश मिळवून नफा मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय त्याच प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि एनएसई, मुंबईचे अज्ञात अधिकारी आणि इतर अज्ञात व्यक्तींची चौकशी करत होते.

सेबीने दिलेल्या माहितीनुसार चित्रा या हिमालयातील एका योगी बाबांच्या सल्ल्यानुसार सर्व निर्णय घेत होत्या. या बाबांच्या सल्लानंतरच त्यांनी आनंद सुब्रहमण्यम यांना एक्सचेंजचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्त केलं होतं. सेबीने चित्रा रामकृष्ण आणि यात सहभागी असलेल्या इतर काही व्यक्तीबाबत आज  एक आदेश काढत ही माहिती दिली आहे.

 

 

 

Protected Content