निमखेडी शिवारातून सुताराची दुचाकी चोरट्यांनी लांबविली; तालुका पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील निमखेडी शिवारातून फर्निचरचे काम करणाऱ्या सुताराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना रविवारी उघडकीला आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, नागराज भिला देवरे (वय-४७) रा. हरीविठ्ठल नगर स्टॉप हे सुतारकाम व फिर्निचरचे काम करतात. मिळालेल्या ऑर्डरप्रमाणे ते काम करतात. शहरातील निमखेडी शिवारातील सागर कन्स्ट्रक्शन येथे दरवाजा व खिडक्यांचे माप घेण्यासाठी ३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता दुचाकी (एमएच १९ एझेड २९५९) ने गेले. कन्स्ट्रक्शन कामाच्या बाजूला दुचाकी पार्क करून माप घेण्यासाठी गेले. दुपारी २ वाजता परत घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना दुचाकी जागेवर आढळून आली नाही. दिवसभर दुचाकीचा शोध न लागल्याने मंगळवारी ४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता तालुकापोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना सुशिल पाटील हे करीत आहे.

Protected Content