भुसावळच्या उपनगराध्यक्षपदी प्रमोद नेमाडे यांची बिनविरोध निवड

भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद नेमाडे यांची आज झालेल्या ऑनलाईन सभेत निवड करण्यात आली आहे.

भुसावळचे उपनगराध्यक्ष रमेश नागराणी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागली होती. यासाठी दोन-तीन सदस्यांची नावे चर्चेत होती. या अनुषंगाने आज नगरपालिका प्रशासनाची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यात उपनगराध्यक्षपदासाठी प्रमोद नेमाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

प्रमोद नेमाडे हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक असून ते एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांना उपनगराध्यक्षपदासाठी दोन महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर निवडणुकीआधी अजून एका सदस्याला दोन महिन्यांसाठी संधी मिळणार आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.