भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील किन्ही येथील ग्रामसेविकेने बदली रद्द करण्यासाठी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पुन्हा फेरतपासणी करावी, अशी मागणी जि. प. सदस्य पल्लवी सावकारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्याकडे केली आहे.
जि. प. सदस्य पल्लवी सावकारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांना निवेदन दिले असून यात किन्ही येथील ग्रामसेविकेबाबत तक्रार करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, ग्रामसेविकेने हृदयासंबंधी आणि पक्षाघाताचा त्रास असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्रानुसार बदली थांबवण्यात आली आहे. तथापि, संबंधीत ग्रामसेविकेने सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करीत वैद्यकीय तपासणीची मागणी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली होता. त्यानुसार पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता संबंधित ग्रामसेविकेला आरोग्य विषयक कोणत्याही प्रकारची समस्या नसल्याचा अर्थात रिपोर्ट नील असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सकांनी दुसरा रिपोर्ट दिला आहे. यामुळे यात घोळ झाल्याने बदलीसाठी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची फेरतपासणी करावी, अशी मागणी सावकारे यांनी सीईओ यांच्याकडे केली आहे.