भुसावळला मिळाले आयपीएस अधिकारी; कुमार चिंथा रूजू

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमिवर सहाय्यक पोलीस अधिक्षकपदी कुमार चिंथा यांच्या माध्यमातून आयपीएस अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे.

भुसावळात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून खून व गोळीबार या बाबी नित्याच्या झाल्या आहेत. यामुळे शहरात आयपीएस अधिकारी असावा अशी मागणी होत होती. अलीकडेच गजानन राठोड यांची बदली झाल्यानंतर या मागणीला जोर आला होता. भुसावळकरांची ही मागणी आता पूर्ण झाली असून सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून आयपीसएस अधिकारी कुमार चिंथा यांनी आज पदभार स्वीकारला आहे.

याप्रसंगी कुमार चिंथा यांनी आपण कोणत्याही प्रकारच्या दडपणाला बळी न पडता शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करणार असल्याची ग्वाही दिली. गुन्हेगारीच्या परराज्यातील कनेक्शनकडे लक्ष देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याला आपले प्राधान्य असेल असे कुमार चिंथा म्हणाले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.