अनिल चौधरींना दिलासा : रक्कम जमा केल्यानंतर कोर्टाचा निर्णय

भुसावळ, प्रतिनिधी । येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी एका महिलेकडून ६० लाख ७० हजार रूपये घेऊन गाळे खरेदीस टाळाटाळ केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ही रक्कम न्यायालयात जमा केली आहे. यानंतर कोर्टाने त्यांना दोन आठवड्यांपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत वृत्त असे की, https://livetrends.news येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी गत विधानसभा निवडणुकीच्या काळात आपल्या मालकीचा नवशक्ती आर्किडमधील गाळा विक्रीसाठी काढला होता. हा गाळा ममता सुधाकर सनान्से यांनी ६० लाख ७० हजार रूपये भरून विकत घेतला होता. मात्र अनिल चौधरी यांनी नंतर गाळा खरेदी करून देण्यासाठी टाळाटाळ केली. यामुळे संबंधीत महिलेने अनिल चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

यानंतर अनिल चौधरी यांनी जिल्हा व सत्र न्यायालय तसेच हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला असता त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. https://livetrends.news येथे २१ मे २०२१ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायाधिशांनी अनिल चौधरी यांनी पहिल्यांदा ६० लाख ७० हजार रूपये जमा करावेत, नंतरच जामीन मागावा असे स्पष्ट निर्देश दिले होते. तसेच त्यांना ही रक्कम भरण्यासाठी २४ मे २०२१ ही अंतीम मुदत देण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशानुसार अनिल चौधरी यांनी न्यायालयात ६० लाख ७० हजार रूपये भरले आहेत. https://livetrends.news ही रक्कम भरल्यानंतर २६ मे रोजी कोर्टात झालेल्या सुनावणी श्री. चौधरी यांना दोन आठवड्यांपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश दिनेश माहेश्‍वरी आणि अनिरूध्द बोस यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना ही माहिती सनान्से यांनी दिली.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे अनिल चौधरी यांना दोन आठवड्यांपुरता दिलासा मिळाला आहे. तर कोर्टाने संबंधीत खटला हा पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे यात काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content