Home क्राईम जळगावात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्त्या

जळगावात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्त्या

0
100

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील शनीपेठेत राहणाऱ्या एका प्रौढाने नैराश्यातून आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना आज (दि.२१) सायंकाळी ४.३० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद लालचंद दायमा (वय ५०) यांनी नैराश्यातून राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्महत्त्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात म्हटले होते की, “माझ्या सवयी आणि स्वभावामुळे इतरांना त्रास होतो आहे व पुढेही वाढत राहील, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, याला कोणीही जबाबदार धरू नये, लहान मोठ्यांनी माफ करावे.” ही घटना त्यांच्या पुतण्याच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.


Protected Content

Play sound