भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ऐन सणासुदीचे दिवस सुरू होत असतांनाच अचानक महत्वाच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.
बिलासपूर विभागात सुरू असलेले चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने २१ सप्टेंबरपासून सप्टेंबरपर्यंत भुसावळ विभागातून धावणार्या महत्वाच्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.
रद्द झालेल्या गाड्यांमध्ये शालिमार एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १८०२९-३०), हावडा- मुंबई मेल (१२८०९-१०), हावडा-मुंबई (२२८५९-६०), दुरंतो एक्सप्रेस (१२२६१-६२), पुणे-हावड़ा एक्सप्रेस (१२२६१-६२), हावडा-पुणे एक्सप्रेस (१२२२१-२२), हटिया-पुणे एक्सप्रेस (२२८४५-४६), भुवनेश्वर एक्सप्रेस (१२८७९-८०), हमसफर एक्सप्रेस(२०८२१-२२), पोरबंदर-शालिमार एक्सप्रेस (१२९०५-०६), ओखा- शालिमार एक्सप्रेस (२२९०५-०६), मालदा-सुरत एक्सप्रेस (१३४२५०२६), समरसता सुपरफास्ट एक्सप्रेस (१२१५१-५२), शालिमार-भुज एक्सप्रेस (२२८२९-३०), कामाख्या एक्सप्रेस (२२५११-१२),
साईनगर शिर्डी एक्सप्रेस (२२८९४-९५), ज्ञानेश्वरी एक्सप्रेस (१२१०१-०२), पुरी-मुंबई एक्सप्रेस (२२८६५-६६) आदींचा समावेश आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने या गाड्या रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा केली असून यासाठी तिकिट काढलेल्या प्रवाशांना याचा परतावा मिळणार आहे. तथापि, दूरवरच्या प्रवासाला जाणार्यांची यामुळे मोठी गैरसोय होणार आहे. लवकरच नवरात्र सुरू होत असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वर्दळ वाढणार असतांनाच या गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.