लेवा शुभमंगल वधू-वर सूचिमध्ये नोंदणीस प्रारंभ

भुसावळ प्रतिनिधी | लेवा पाटीदार समाजातील उपवर-वधूंची लेवा शुभमंगलच्या माध्यमातून नोंदणी करण्यात येत असून समाजबांधवांनी या मंचावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकल लेवा पाटीदार समाजातील अविवाहित, घटस्फोटित, विधवा, विधूर अशा सर्व वधू-वरांची सूची तयार केली जात आहे. ही सूचि ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतीत करण्यात येत आहे. यात नावनोंदणीची अंतिम मुदत १० ऑगस्ट आहे. ही नोंदणी ऑनलाइनदेखील करता येणार आहे. यामुळे कुणीही लेवा शुभमंगल ऍप अथवा संकेतस्थळावरून याची नोंदणी करू शकतो.

तसेच या सूचिमध्ये ऑफलाईन नोंदणीचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी महत्वाच्या शहरांमध्ये नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये भुसावळ येथे जंगले अँड सन्स पांडुरंग टॉकीज जवळ, गायत्री ट्रॅव्हल्स फैजपूर, तपस्या कॉम्पुटर फैजपूर, सलील महाजन यावल, अजित किनगे मोताळा, सुनील पाटील जळगाव, निशा अत्तरदे डोंबिवली यांच्याशी संपर्क साधून फॉर्म भरून द्यावा असे आवाहन लेवा शुभमंगलतर्फे करण्यात आले आहे.

इच्छुक वर-वधू खालील लिंकवर क्लिक करून नाव नोंदणी करू शकतात.

https://levashubhmangal.com/pustak_suchi/?fbclid=IwAR1KrNSiQDKco_sa4il9E2Cl6s9RHUNSzE659nCPkCyu6Ty2gqK7MGnvy_A

लेवा शुभमंगल ऍपची लिंक खाली दिलेली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.flyctsofttech.matrimonialapp

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!