भुसावळ शहरात पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता करा : मिनाक्षी जावरे यांची मागणी

भुसावळ, प्रतिनिधी ।  नगरपालिकेने पाण्याच्या टाकीची स्वच्छता करणे तसेच भुसावळ शहरातील कचऱ्याचे ढीग, नाली व  नाल्यांची सफाई करावी  अशी मागणी जळगाव ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशन जिल्हा उपाध्यक्षा  मिनाक्षी जावरे  यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. 

कोरोना महामार्गच्या काळात बऱ्याच लोकांना भीतीचे वातावरण आहे त्यातच टायफाईड व इतर नेहमीप्रमाणे पावसाळ्यात होणाऱ्या आजारापासून मुक्ती मिळण्याकरिता नगरपालिकेची पाण्याची टाकी स्वच्छ करणे तसेच नाली व नाले यांची सफाई करणे व कच-याचे ढीग, पेस्ट कंट्रोल करणे गरजेचे आहे. पावसाळा सुरू होण्याआधीच ही कामे सुरू केली तर भुसावळ शहरातील नागरिकांच्या हिताचे होईल. तरी शहरातील कचऱ्याचे ढीग, नाली व नाल्यांची सफाईची    कामे त्वरीत करण्याची  मागणी काँग्रेसतर्फे मिनाक्षी जावरे यांनी केली आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.