ऑनलाईन प्रश्नमंजुषा परिक्षेत अश्विनी पाटील प्रथम

यावल प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथील वाणिज्य, अर्थशास्त्र मंडळाच्या व आयक्यूएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन प्रश्नमंजुषा परिक्षा घेण्यात आली असून यात अश्विनी पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथील वाणिज्य, अर्थशास्त्र मंडळाच्या व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) यांनी केले.                           

सदर कार्यक्रमात ६९ विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या प्रश्नमंजुषा परीक्षेत प्रथम अश्विनी संजय पाटील (एफ. वाय. बी. कॉम.), खंबायत पुनम समाधान (एस. वाय. बी. ए.) व तृतीय तडवी असिफ सुभान (टी. वाय. बी. ए.) या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.  कार्यक्रम यशस्वीरित्या  होण्यासाठी उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा.  डॉ. एस. पी. कापडे, प्रा. डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. डॉ. सुधा खराटे, प्रा. एस. आर. गायकवाड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

Protected Content