कन्यारत्न प्राप्त झाल्याने शासकीय रुग्णालयात बिस्किट व फळे वाटप

पाचोरा, प्रतिनिधी । मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी माणुसकी समूहतर्फे  वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात.  यामध्ये आज माणुसकी रुग्णसेवा समूह जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने व चंद्रकांत गीते यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय जळगाव येथे बिस्किटे व फळे रुग्णांना वाटप करण्यात आले.

 

लेकीच्या जन्मदर वाढावा यासाठी सुमित पंडित हे २०१६ पासुन ज्या कुटुंबात मुलीचा जन्म होइल त्या कुटुंबातील वडिलांना २ महिने २१ दिवस सलुन सेवा मोफत करतात व आईला साडी चोळी व मुलीला ड्रेस व मुलीचे जावळ देखील मोफत करतात. एवढच नाही तर सुकन्या योजनेचे खाते उघडून २८१ रुपये मुलीच्या नावे टाकतात त्यांनी कितीतरी जन्म दात्यांच्या चेहऱ्यावर हसु फुलविले आहे. समाजातील काही लोकांची मानसिकता बदलायला हवी  हा त्या मागचा उद्देश आहे. यावेळी समाजसेवक अनील लुनिया, सुमित पंडित, शामराव पंडित, चेतन पाटील व माणुसकी रुग्णसेवा समूह सभासदांनी सहकार्य केले.

 

Protected Content