‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’चा दणका : सहायक निबंधक कार्यालयात शिवजयंती साजरी न करणाऱ्यांवर होणार कारवाई (व्हिडीओ)

बोदवड, सुरेश कोळी | बोदवड शहरातील सहाय्यक निबंधक कार्यालयात शासनाच्या परिपत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली नसल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात ‘लाईव्ह टेडर्स न्यूज’ने प्रसारित केलेल्या बातमीची लागलीच दखल घेत बोदवड तहसीलदार योगेश टोपे यांच्या आदेशानुसार तलाठीसह पथकाने पंचनामा केला.

राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये शिवजयंती साजरी करणे बंधनकारक आहे. सर्व शासकीय कार्यालयामधून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आली. मात्र सहाय्यक निबंधक कार्यालयास विसर पडल्याचं दिसून आलं. सकाळपासून हे कार्यालय बंद असल्याने यावर कारवाई करण्यात येणार आहे का हा मुद्दा प्रकाशित झाला होता. त्या संदर्भात ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या प्रतिनिधींनी खात्याच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी समाधानकारक उत्तर न देता आपण बाहेरगावी असल्याचं सांगितलं. याबाबत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता नियमानुसार शिवजयंती साजरी करणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं

त्यानुसार ‘लाईव्ह टेडर्स न्यूज’ने याविषयी आसपासच्या नागरिकांना याबाबत विचारणा करत सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तपासाअंती कार्यालयात जयंती साजरी न झाल्याची खात्री पटताच ‘लाईव्ह टेडर्स न्यूज’ने यांसदर्भात ”सहाय्यक निबंधक कार्यालयास पडला शिवजयंतीचा विसर” या शीर्षकाचे वृत्त सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी प्रसारित केले.

बातमीची लागलीच दखल घेत आज शनिवार, दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी न केल्याने सायंकाळी ५ वाजता तलाठीसह त्यांच्या पथकाने स्पॉट पंच यांच्यासमोर प्रत्यक्ष कार्यालयात पाहणी केली असता पाहणी केली. दरम्यान तेथे शिवजयंती साजरी केली नसल्याचे आढळून आले. या संदर्भात पंच राजू पाटील, अशोक हिवराळे, नरेंद्र कदम, केदार उगले व तलाठी मंगेश वासुदेव पारिसे यांच्या समक्ष घटनेचा पंचनामा करण्यात आला. जयंती साजरी न केल्यामुळे काही शिवप्रेमींनी या कार्यालयाबद्दल संतप्त भावना आमच्या प्रतिनिधींजवळ व्यक्त केल्या. याप्रकरणी सहायक निबंधक कार्यालयात शिवजयंती साजरी न करणाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होईल याकडे बोदवडकरांचे लक्ष लागून आहे.

 

व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/475447707422744

Protected Content